पुणे ग्रामीण,दि.०९ :- पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीने अपेक्षित वर्चस्व संपादन केले .
जिल्हा परिषदेवर शांताराम इंगवले व मिलिंद वाळंज यांनी बाजी मारली. हिंजवडीतील जागा भाजपाच्या शिवाजी बुचडे यांनी खेचून आणली.
हिंजवडी-माण परिसरातील राजकीय चित्र स्पष्ट केले असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील थेट संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या हिंजवडी-माण गटात भाजपाचे शिवाजी बुचडे पाटील यांनी विजय मिळवत पक्षाचे वर्चस्व राखले आहे. तर पंचायत समितीच्या हिंजवडी गणात भाजपाच्या ऐश्वर्या वाघमारे, तर माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा बाबाजी शेळके विजयी झाल्या आहेत.
मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 तर भाजपाचा 1 उमेदवार निवडून आला आहे.
मुळशीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
मुळशी zp final निकाल
पौड अंबडवेट जिल्हा परिषद गट
मिलींद वाळंज राष्ट्रवादी काँग्रेस
5297 मतांनी विजयी
हिंजवडी-माण गट
शिवाजी बुचडे, भाजपा
1966 मतांनी विजयी
भुगांव पिरंगुट गट
शांताराम इंगवले राष्ट्रवादी काँग्रेस
1384 मतांनी विजयी
पौड पंचायत समिती गण
काजल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस
2145 मतांनी विजयी
अंबडवेट पंचायत समिती गण
प्रविण धनवे, राष्ट्रवादी काँग्रेस
1776 मतांनी विजयी
माण पंचायत समिती गण
मंदा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस
2310 मतांनी विजयी
शहिंजवडी पंचायत समिती गण
ऐश्वर्या वाघमारे, भाजपा
1322 मतांनी विजयी
भूगाव पंचायत समिती गण
दगडू करंजावणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
438 मतांनी विजयी
पिरंगुट पंचायत समिती गण
राहुल पवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
363 मतांनी विजयी
