सोमेश्वर वाडी परिसरातील संध्या नगर येथील ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन मयुरी कोकाटे यांच्या हस्ते

पुणे,दि.१० : –प्रतिनिधी संकेत संतोष काळे :-प्रभाग क्र. ९ मधील पाषाण येथील-सोमेश्वरवाडी परिसरातील संध्या नगर येथील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित असलेली ड्रेनेज लाईनची समस्या मार्गी लावण्यासाठी आज मंगळवार (दि. १० फेब्रुवारी २०२६) रोजी सायं. ५.०० वाजता भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
नगरसेविका सौ. मयुरी राहुल कोकाटे यांच्या पुढाकारातून हा विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संध्या नगर येथील स्थानिक नागरिक, महिला मंडळ तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पारंपरिक पूजन करून नारळ फोडत कामाला सुरुवात करण्यात आली.


या ड्रेनेज लाईनमुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होणार असून पावसाळ्यात होणारी दुर्गंधी, साचलेले पाणी व आरोग्याच्या समस्या कमी होतील, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. तसेच या कामामुळे परिसरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असल्याचे नगरसेविका कोकाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *