पुणे : प्रमोद निम्हण यांना राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाची उमेदवारी नाकारण्यात आल्याचा पाषाणमधील ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. इतकेच नव्हे, तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आज गुरुवार १ जानेवारी रोजी संपूर्ण पाषाणमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रमोद अण्णा निम्हण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल स्थापन करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. पक्ष पातळीवर त्या संदर्भातील सर्व नियोजन झाले होते. नागरिकांकडून देखील प्रमोद अण्णांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला होता.
. प्रमोद निम्हण यांना डावलण्यात आल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आज नागरिकांनी नवीन वर्षाचा पहिला दिवस असूनही दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
