सायबर सुरक्षेसाठी पुण्यात हवीत पाच नवीन पोलीस ठाणी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.१७ :- वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने पुण्यात पाच नवीन सायबर पोलीस ठाणी तातडीने सुरू करावीत, अशी आग्रही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

पुणेकरांच्या सुरक्षेसाठी सायबर पोलीस ठाण्यांची मागणी गेल्या अधिवेशनातही केली होती. आता तातडीने कार्यवाही व्हावी, अशी विनंती असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

सीसीटीव्ही जाळे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान

पुणे शहरात १०,००० नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम त्वरित सुरू करण्याची आणि राज्याची ‘सीसीटीव्ही पॉलिसी’ लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

तसेच सीसीटीव्ही प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी गुन्हेगारांचा डेटाबेस ‘फेस रेकग्निशन’ तंत्रज्ञानाद्वारे थेट कॅमेऱ्यांशी जोडण्याची सूचना केली. यामुळे संशयित व्यक्ती दिसताच सायबर सेलला तात्काळ अलर्ट मिळेल, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.

औंध पशुवैद्यकीय रुग्णालयाचा कायापालट

औंध येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात सध्या केवळ बाह्यरुग्णसेवा उपलब्ध आहे. येथे मल्टीस्पेशालिटी उपचार केंद्र सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रियेला गती द्यावी आणि रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पशुसंवर्धन विभागाकडे आमदार शिरोळे यांनी केली.

पुण्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी विविध विषय मांडून त्यांचा पाठपुरावा माझ्याकडून असाच सुरू राहील, असेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *