पुणे दि. १ (जिमाका, वृत्त सेवा) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ जानेवारी २०२६ मध्ये होत असून, मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्या अर्जदारांनी १५ जानेवारी २०२६ रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती (LL) व पक्की अनुज्ञप्ती (DL) चाचणीसाठी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे आणि जे मतदार आहेत, अशा अर्जदारांना विशेष सवलत देण्यात येत आहे. संबंधित अर्जदारांनी शासकीय सुट्टी वगळता ८ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत चाचणीसाठी उपस्थित रहावे. अशा अर्जदारांना नवीन अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता नाही.
तसेच, २५ जानेवारी २०२६ रोजी मिळालेली अपॉइंटमेंट वैध धरली जाणार असून, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व नागरिक व मतदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा आणि अनुज्ञप्तीची चाचणी आपल्या सोयीस्कर वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
