पुणे,दि.०८ : – येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे महाराष्ट्र राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ चा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) मोठ्या उत्साहात पार पडला. शिवछत्रपती पुरस्कार (२००१) प्राप्त व आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेती (पॉवरलिफ्टिंग) राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू तथा कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती विद्या रोहिदास शिरस यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
कारागृह विभागाचे “सुधारणा व पुनर्वसन” हे ब्रीद लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील ताण-तणाव कमी व्हावा, शारीरिक-मानसिक आरोग्य सुदृढ राहावे आणि संघभावना वाढीस लागावी या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथील क्रीडांगणावर स्पर्धा पार पडल्या.
येरवडा व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, तसेच सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व येरवडा खुले जिल्हा कारागृह आणि प्रशिक्षण महाविद्यालय अशा विविध संघांमधील एकूण १३९ महिला-पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला. वैयक्तिक प्रकारात १००, २००, ४००, ८०० मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, कुस्ती, कराटे, १५०० मीटर चालणे, बॅडमिंटन यांचा समावेश होता; तर सांघिक प्रकारात कबड्डी, व्हॉलीबॉल आणि रस्साखेच स्पर्धा घेण्यात आल्या. निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे.
स्पर्धेत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे राजेंद्र कुंभार यांना उत्कृष्ट पुरुष खेळाडू तर मुख्यालय संघाच्या श्रीमती छाया कोळेकर यांना उत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार मिळाला. सर्वसाधारण विजेतेपद येरवडा मध्यवर्ती कारागृहाने पटकावले, तर उपविजेतेपद कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाला मिळाले.
कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग). सुनिल एन. ढमाळ यांनी प्रास्ताविकात स्पर्धांच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. प्रमुख अतिथ
