पुणे,दि.०६ :- राज्यातील ज्येष्ठ नेते अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रम आणि नागरिकांसाठी विशेष आयोजन केले जाते. मात्र, शहरावर शोककळा पसरलेल्या या परिस्थितीत उत्सवमूर्ती वातावरण टाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाने सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळातही शोक व्यक्त केला जात आहे.
