विदेशी दारुची वाहतूक करणार-या पिकअप टेम्पो मध्ये 16 लाख रु. किं.ची विदेश दारुच्या बॉटल व पिकअप गाडीसह मुद्देमाल जप्त

पुणे,दि.१३:- पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना, वाघोली ते केसनंद जाणारे रोडने एक इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे पिकअप पाठीमागे काळे रंगाची ताडपत्री लावलेले वाहनातुन विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणार आहे अशी गुप्त बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी वाघोली कडुन येणारे वाहनाची पाहाणी करीत असतांना बातमीप्रमाणे एक पांढरे रंगाचे वाहन येत असलेले दिसल्याने सदर वाहनावरील वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे ताब्यातील वाहन रोड कडेला उभे केले, सदर वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने

त्याचे नांव कपील दिगंबर शाहु वय २६ वर्षे रा लाडबावस्ती, केसनंद असे असल्याचे सांगीतले.

सदर इसमाच्या ताब्यातील पिकअप वाहनामधील मालाबाबत विचारणा केली असता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स असल्याचे सांगितले, त्यास दारु वाहतुकीचा व बाळगण्याचा परवाना मागीतला असता त्याने तो नसल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात असलेले पांढरे रंगाचे पिकअप नंबर एम एच ३८ एक्स २८२२ मध्ये विनापरवाना विदेशी दारु मिळुन आली त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे-

१६,७३,८४५/- रु किं ची विदेश दारुच्या ७,४४१ बॉटल, ७,००,०००/- रु किंचे पिकअप नंबर एम एच ३८ एक्स २८२२ गाडी असा एकूण २३ लाख ७३ हजार ८४५/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई करण्यात आली.

सदरची कामगीरी, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर नूतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे, यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *