सोमेश्वरवाडीच्या राजेंद्र लांबाते यांच्या मुलाचे सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश

पुणे,दि.०६:- सोमेश्वरवाडी येथील  राजेंद्र दिगंबर लांबाते यांच्या मुलाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे लांबाते कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. सीए ही देशातील अत्यंत कठीण मानली जाणारी परीक्षा असून पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण करणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मित्रपरिवार, नातेवाईक आणि सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *