पुणे,दि.२७: -हडपसर येथील सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल सायन्स जुनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा आणि वैज्ञानिक प्रयोगाचे आयोजन केले होते. शाळेचे संस्थापक. अध्यक्ष. प्रमुख पाहुणे ए. एल. नर्सिंग राव यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुक करत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बनकर. शाळेचे ट्रस्टी राज लक्ष्मणराव. स्वर्णा राव. सोनिया मोरे. संदेश मोरे. मनोहर राम रेड्डी. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
