पुणे,दि.२६ : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर बोपोडी येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर व्हावे , अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी ) विधान सभेत केली.जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा ते संचेती हॉस्पिटल या पट्ट्यात एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही.या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त असल्याने अपघातांचे प्रमाण मोठे असते. तसेच महामार्गावर कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी आणि खडकी अशा मोठ्या परिसराचा समावेश आहे. येथील अपघातातील रुग्णाला ससून किंवा वायसीएम रुग्णालयात नेताना ‘गोल्डन अवर’ निघून जातो.तरी सरकारकडे मागणी आहे की, खडकी-बोपोडी दरम्यान किमान ३०० बेडचे सुसज्ज शासकीय रुग्णालय तातडीने मंजूर करावे, जेणेकरून ससून आणि औंध रुग्णालयावरील ताण ही कमी होईल , असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.शासकीय रुग्णालयात मानसिक तणाव ( स्ट्रेस ) निवारण केंद्र सुरु करावे, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
सध्या हृदयविकार, मेंदूच्या आजारांचे प्रमाण मानसिक ताण तणावाने वाढले आहे याकडे आ. शिरोळे यांनी वेधले .
