कै. पै. सागरभाऊ कोळेकर स्मरणार्थ पुणे जिल्हा युवा नेता कुस्ती स्पर्धा उत्साहात

कै. पै. सागरभाऊ कोळेकर यांच्या स्मरणार्थ युवा नेते, मुळशी केसरी समीरभाऊ कोळेकर यांच्या आयोजनातून ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या वेळी बाळासाहेब लक्ष्मी रामदास चांदेरे (शिवसेना जिल्हाप्रमुख, पुणे तथा माजी सभापती प.स. मुळशी, जि. पुणे) यांनी उपस्थित राहून पैलवानांना पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मनोगतातून कुस्ती या पारंपरिक खेळाचे महत्त्व अधोरेखित करत, ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्यस्तरावर आपली छाप पाडावी, असा विश्वास व्यक्त केला.
स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पैलवानांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. या निमित्ताने परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *