१९ फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

पुणे,दि.१८ : – एम.एल.आर. टाकीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगच्या मुख्य जलवाहिनीत मोठी गळती झाल्यामुळे ती दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत काही भागात विस्कळीत पाणीपुरवठा होणार आहे.
या कामामुळे केळेवाडी येथून होणारा पुरवठा थांबणार असून गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेल्वे कॉलनी, कोथरूड परिसर, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, गुजरात कॉलनी, गाडवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोक नगर, खेळवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, पोलिस लाईन, संगमवाडी आदी भागांना फटका बसणार आहे.
महापालिकेने नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *