पुणे,दि.१७ :-पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात मोठी कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर व मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार यांच्या नियंत्रणाखाली खराडी परिसरातील सय्यदनगर (नवीन हडपसर हद्द), पुणे पेठ सर्वे क्रमांक ६ व ७६ तसेच सदाशिव पेठ परिसरात सकाळी ९ वाजता ही मोहीम राबविण्यात आली.
या संयुक्त कारवाईत एकूण सुमारे १७,५०० चौरस फूट क्षेत्रातील कच्चे-पक्के शेड व अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. बांधकाम विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान मनपा पोलीस १६, एमएसएफ जवान २५, जेसीबी ५, गॅस कटर ५, ब्रेकर ४, अतिक्रमण निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक ६ तसेच ४५ विगारी सेवकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
याचवेळी शहरात अतिक्रमणाविरोधात स्वतंत्र मोहीम राबवत
हातगाडी – ६
पथारी – ९४
काउंटर – ५
इतर साहित्य – ७२
सिलेंडर – ८
अशा एकूण १८५ घटकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बांधकाम विकास विभागाच्या सहकार्याने करण्यात आली असून आकाशचिन्ह विभागालाही मदत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
