पुणे शहरात जनगणना २०२७ च्या पहिल्या फेरीची तयारी सुरू; १ मे ते १५ जून दरम्यान घरांची डिजिटल गणना

पुणे,दि.०३:- भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्यावतीने भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या फेरीतील (घरांची यादी व घरांची गणना) कामकाज पुणे महानगरपालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राबविण्यात येणार आहे. ही जनगणना दिनांक १ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जनगणना संचालनालय, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार पूर्वतयारीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणे शहरातील १५ चार्ज जनगणना अधिकारी व शहर जनगणना अधिकारी यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
जनगणनेचे कामकाज दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. यंदा प्रथमच भारतात पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना होणार असून, जनगणना प्रगणकांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण व इतर बाबी शासनाने निश्चित केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जनगणना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करावी, असे निर्देश ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *