पुणे : पाषाण–पाषाण–संध्या नगर सोमेश्वर वाडी व इतर परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेविका मधुरी कोकाटे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.
या बैठकीस पाषाण–पाषाण–संध्या नगर सोमेश्वर वाडी व इतर परिसरातील आरोग्य निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छ संस्था प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्या नगर येथील नागरिकांनी डिरनेस लाईन, तसेच कमी दाबाने येणारे पाणी याची निवेदन दिले तसंच इतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यांची स्वच्छता, दैनंदिन कचरा उचल, कचरा विलगीकरण तसेच कचरा संकलन स्पॉटच्या स्वच्छतेबाबतच्या अनेक समस्या नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्यासमोर मांडल्या.
स्वच्छता कर्मचारी व संबंधित संस्थांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून पुणे महानगरपालिकेच्या नियोजनाच्या मदतीने परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, तसेच नागरिकांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ व निरोगी परिसर निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
या बैठकीला शहर भाजप उपाध्यक्ष राहुल कोकाटे, भगवान निंबाळकर, उमा कोकाटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
