पुणे,दि.१३ : – पुणे महानगरपालिका निवडणुकांत मतदानासाठी १५ जानेवारीला कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांनी कामगारांना भरपगारी सुटी द्यावी. कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हे आवश्यक आहे. पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी वेळेत दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असे कामगार उपआयुक्त निखील वाळके यांनी जाहीर केले आहे. कामगारांना मतदानासाठी सुटी अथवा वेळेची सवलत न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई तंबीही त्यांनी दिली.
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विसंजय जाधवभागाच्या ३० डिसेंबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांनी कामगारांना मतदानासाठी सवलत देणे बंधनकारक आहे. त्यात खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेल दुकानांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचा समावेश आहे. त्यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तेथे दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असे उपायुक्त वाळके यांनी म्हटले आहे.
