पुणे ,दि.११:- पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
त्या अनुषंगाने निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मतदान साहित्य छपाई व वितरण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोड याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, कसबा

विश्रामबाग वाडा या कार्यालयामार्फत सुरु असलेले EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर, उपायुक्त तुषार बाबर, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहायक आयुक्त सोमनाथ आढाव व सहायक आयुक्त कैलास केंद्रे इ. अधिकारी उपस्थित होते.
