परशुराम चषकाचे दिमाखात उद्घाटान अश्वमेध संघ ठरला पहिल्या दिवशीचा स्टार

पुणे,दि.११ :- परशुराम हिंदू सेवा संघाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म्स येथे दोन दिवसीय परशुराम चषक 2026 फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश सुमंत संपर्कप्रमुख स्वप्निल कुलकर्णी सागर मांडके शहराध्यक्ष शैलेश खोपटीकर हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष आनंद दवे विजय शेकदार उपक्रम प्रमुख विवेक लोहारेकर सहप्रमुख किशोर होले आदींची उपस्थिती होती. शनिवार 10 जानेवारी व रविवार 11 जानेवारी असे दोन दिवसाचे आयोजन असून शनिवारी पहिल्या दिवशी एकूण राज्यातील विविध शहरांमधून आलेले सात संघ सामने खेळले प्रामुख्याने व्ही के एस स्पोर्ट्स, कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ, मोरया 11, अश्वमेध पुणे, वाकण क्रिकेट संघ, वेदश्री 11 आळंदी, मृत्युंजय 11 या संघांमध्ये सामने खेळवण्यात आले यामध्ये अश्वमेध पुणे हा संघ आजच्या दिवसाचा उत्तम संघ निवडला गेला रविवारी विविध शहरांमधून येणारे नऊ संघ खेळणार असून अंतिम सामना जाईल. प्रथम पारितोषिक 40000 द्वितीय पारितोषिक 30000 तृतीय पारितोषिक 15000 चतुर्थ पारितोषिक 15000 व सर्वोत्तम गोलंदाज सर्वोत्तम फलंदाज सामनावीर अशी विविध पारितोषिके दिली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *