पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmcvotersearch या पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण

पुणे,दि.०९:- पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी pmcvotersearchwebsite हे निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे आज मा .महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या संकेतस्थळावर मतदार यादी बाबतची सर्व आवश्यक माहिती वेळेत, पारदर्शकपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच communication plan याचे देखील या प्रसंगी अनावरण करण्यात आले .या प्रसंगी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री.ओमप्रकाश दिवटे, मा.उपायुक्त निवडणूक श्री. प्रसाद काटकर, मा.रवी पवार कर आकारणी कर संकलन प्रमुख,मा.विजय थोरात उपायुक्त सामान्य प्रशासन, मा.श्री निखिल मोरे उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ , मा.तुषार बाबर उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
मा.उपायुक्त माहिती व जनसंपर्क
पुणे महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *