सनी विनायक निम्हण यांनी नगरसेवक पदाचा भरला अर्ज

पुणे: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार, ३० डिसेंबर) हा शेवटचा दिवस आहे. बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म (AB Form) दिले जात आहेत. आज मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातही अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी३ वाजेपर्यंत म्हणजे चार तास आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आघाडी युतीचे जागावाटपच काय तर उमेदवार यादीदेखील जाहीर केलेली नाही. निवड झालेल्या उमेदवारांना परस्पर एबी फॉर्मचे (AB Form) वाटपच करण्यात आले.
प्रभाग क्रमांक 8 मधून सनी विनायक निम्हण यांनी बीजेपी कडून कमळ हे चिन्ह चा अर्ज आज दुपारी भरला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *