पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कसबा गणपती मंदिर व तांबडीजोगेश्वरी मंदिर येथे पुष्पहार अर्पण

पुणे,दि.१५ :- पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. १५ फेब्रुवारी २०२६) विविध ठिकाणी अभिवादन व पूजनाचे कार्यक्रम पार पडले. कसबा गणपती मंदिर तसेच तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे पुणे शहराच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या शुभहस्ते व उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाजवळील संत सेवालाल महाराज यांच्या छायाचित्रासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *