शिरड दि०६ :- शिरड येथे जि. प.प्रा. शाळा शिरड पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून निवघा सर्कल मधील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रामेश्वर बोरकर ( दैनिक लोकमत), बंडु माटाळकर ( दैनिक सकाळ), गजानन कदम (दैनिक देशोन्नती) सुदर्शन कऱ्हाळे(दैनिक पुण्य नगरी), देवीदास कल्याणकर (दैनिक एकमत), .आदित्य कदम ( दैनिक पुढारी)व महेश बोरकर ( दैनिक पुढारी) यांचा बुके व पुस्तकरुपी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान नाटीकेत शाळा विभाग स्तरावर गेल्याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला पत्रकार संघातर्फे बक्षीस देण्यात आले. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश विभुते, मोहन कुलकर्णी, सौ.मनिषा कुरे, सौ. अनिता धुतमल व विशेष पुरस्कार प्राप्त सौ.ज्योती किर्तनकार, सौ. मायावती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संजय कल्याणकर , शा.व्य. समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, संजय गोडे व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक येरमलवाड सरांनी केले. सर्व पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेचा आलेख या दोन वर्षांत अग्रस्थानी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गाबणे सरांचे विशेष अभिनंदन व सत्कार पत्रकार बंधुनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.धुतमल मॅडम यांनी केले व आभार कुलकर्णी सरांनी मानले.शाळेचे मुख्याध्यापक गाबणे सर, विभुते सर, श्री. डोके सर, बेळगे सर, केंद्रे सर व शिक्षिका सौ.कुरे मॅडम, सौ.कांबळे मॅडम, सौ. बदनाळे मॅडम, सौ.किर्तनकार मॅडम, सौ. वाघमारे मॅडम व शालेय पोषण आहार प्रमुख शाम कल्याणकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली.
नांदेड प्रतिनिधी संदीप तुपकरी