उस्मानाबाद दि ०६ :- उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार ,मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात दर्पण दिन सोमवारी (६) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी दर्पण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य
तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रारंभी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर यावेळी उस्मानाबाद जिल्हयाचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरी उस्मानाबाद जिल्ह्याचे वृत्तसंपादक धनंजय रणदिवे यांनी केले.कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी तथा खनिकर्म अधिकारी श्री सय्यद, पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, राजाभाऊ वैद्य,एस ए सय्यद,अंबादास दानवे,देविदास पाठक,प्रशांत कावरे,शीला उंबरे,सुभास कदम,उपेंद्र कटके,संतोष शेटे,कैलास चौधरी,किशोर माळी, अजित माळी,नंदू पवार,सलीम पठाण,नवाब मोमीन,प्रशांत नेटके,राहुल सुर्यवंशी , गोविंद पाटील,गणेश जाधव,हरी खोटे,दत्ता शिंदे,सचिन व्हनसाळे,संतोष जोशी,प्रशांत गुंडाळे,सुरज बोराटे,सचिन वाघमारे,बालाजी निरफळ,शाहरुख सय्यद,हेमंत कुलकर्णी, अमजद सय्यद,कलीम मुसा,छायाचित्रकार राहुल कोरे,राजाभाऊ नांदे यांची उपस्थिती होती.शिबिरात मधुमेह,थायरॉईड,किडनीसह विविध आजारांवरील रक्त तपासणी करण्यात आली. शेवटी संघाचे सरचिटणीस श्री संतोष जाधव यांनी आभार मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी हिंद लॅब चे अब्बूबक्र पठाण,कौसर सय्यद,सुफीयान पटेल,अन्सार शेख यांनी परिश्रम घेतले.
उस्मानाबाद- प्रतिनिधी प्रशांत नेटके