पुणे दि,०६ : पुणे बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील डोमला भीषण आग लागली. आज सकाळच्या १२च्या सुमारास या डोमला आग लागली. या घटनेत संपूर्ण डोम जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या पुणे महानगरपालिकाचे वॉटर टँकर घटनास्थळी आल्या आसुन अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.आहे मात्र, अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. ही आग कशी आणि का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट झाले नाही
बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबची ही इमारत सर्वात मोठी इमारत आहे. या इमारतीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पॅनकार्डचा व्यवहार केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही इमारत बंद होती. या इमारतीत कुठलंही काम सुरु नव्हतं, इमारत पूर्णपणे रिकामी होती. मात्र, आज सकाळी १२च्या सुमारास या इमारतीवरील डोमला भीषण आग लागली. जवळपास ४० ते ५० फूट उंच आग दिसत होती इमारतीच्यावरील या डोमला अचानक आग लागली आणि बाणेर परिसरात एकच खळबळ उडाली. या इमारतीत फायबरचं व लाकडी सामान असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची शक्यता वर्तवली जात होती
या आगीमुळे आकाशात धुराचे मोठ मोठे लोळ उठले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूने या इमारतीला घेरलं, जवानांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग खूप मोठी असल्याने त्यावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलेलं नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे देखील अद्याप कळू शकलेलं नाही. व आत्तापर्यंत ही आग ४ वाजेपर्यंत ९५% टक्के पर्यंत आटोक्यात आणली आहे असे अग्निषमक दल यांचे सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, यांनी आमच्या प्रतिनिधीला अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, स्टेशन ऑफिसर पंकज पाथरकर, व प्रभाकर उमराटकर, २० कर्मचारी व अधिकार्यांनी आग आटोक्यात आणली आहे