इंदापूर दि ०६ :- (प्रतिनिधी):- इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न असंख्य प्रलंबित आहेत,मात्र हे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य देण्याची भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन (सोमवार तारीख 6 रोजी)इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानावरून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर बोलत होते.इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते उपाध्यक्ष संदीप सुतार सचिव सागर शिंदे व पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके,इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगण,शिवसेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष नितीन शिंदे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ चंदनशिवे,रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश गणबोटे वसंतराव माळुंजकर,नगरसेवक अनिकेत वाघ, युवक नेते महेंद्र रेडके,श्रीधर बाब्रस,युवक नेते दीपकराव जाधव,शेखर पाटील,काँग्रेसचे नेते काकासाहेब देवकर,अमोलराजे इंगळे,धरमचंद लोढा,ज्ञानदेव डोंबाळे,प्रशांतदादा सिताप, यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गारटकर म्हणाले की, चांगले वार्तांकन केले तर संबंधित पत्रकाराचा दबदबा आदरयुक्त जनतेला राहतो. यातून सामाजिक प्रश्न सुटले जातात तोच आनंद मिळतो दुसऱ्या कामातून मिळत नसतो म्हणून सामाजिक जाणिवेतून पत्रकारिता समाजाचे दुःख दूर करू शकते हे जनतेला माहिती आहे त्यामुळे डिजिटल जमान्यात देखील वृत्तपत्राचे अस्तित्व कायम राहिले आहे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये स्तुत्य उपक्रम राबवले जातात आनंदाची गोष्ट आहे असेही गौरवोद्गार जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले.
पत्रकारितेमध्ये तेवढी ताकत आहे की कोणतेही राजकर्ते चे एकमेकात जमो न जमो यांना एकत्र आणण्याची किमया बातमीदारीतुन केली जाते. पत्रकार बांधवांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी कायम सहकार्य लाभेल अशी माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.यावेळी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार,तसेच इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयराव परीट,व इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्यासह तालुक्यातील सर्व व शासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी पेपर विक्रेते भीमाशंकर जाधव, महेशराव स्वामी,यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान पार पडला.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके व पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर करून प्राध्यापक सुनील मोहिते यांचे धाडशी पत्रकारिता या विषयावर व्याख्यान पार पडले.यावेळी नानासाहेब चांदणे,ज्ञानेश्वर रायते, नितीन चितळकर,सुधाकर बोराटे, संभाजी रणवरे,सचिन खुरंगे,सोमनाथ ढोले,उदयसिंह जाधव,इम्तिहाज मुलानी,महेशराव स्वामी,गोकुळ टंगसाळे,आदम पठाण,बाळासाहेब सुतार,लक्ष्मणराव भिसे,भारत शेडगे,विजय शिंदे,शिवाजी पवार,कैलास पवार,गुरगुडे अमोल यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार ज्ञानेश्वर रायते यांनी केले तर आभार सोमनाथ ढोले यांनी मानले.
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार