दौंड दि,१४ :- पुणे ग्रामीण दौंड शहर मध्ये गुटखा ची मोठ्या प्रमाणे विक्री होत असलेले मा. जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांना समजली त्याबाबत त्यांनी गोपनीय माहिती काढली असता गोल्डन या नावाने प्रसिद्ध असलेला व्यापारी हा होल सेल दरात दौंड मध्ये विक्री करत असले गोपनीय माहिती मिळाली व त्या अनुषंगाने बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक यांना सांगितले व सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले त्या प्रमाणे यादव सो यांनी दौंड मध्ये सदर इसमाचा माहीत घेतली असता सदर इसमाचे सरपंच वस्ती येथे किराणा मालाचे दुकान असून त्याने त्याच्या शेजारील गोडाऊन मध्ये गुटखा भरून ठेवला आहे असे समजल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी छापा मारला असता सदर गोडाऊन मध्ये माणिकचंद, गोवा, विमल, हिरा या कंपनी 1,78,084 चा माल मिळून आला आहे. सदर चा मुद्देमाल अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाई साठी देण्यात आला आहे.सदरचा गुटखा हा नरेश केलदास रोहिडा रा. सरपंच वस्ती दौंड याचा आहे सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे पो.कॉ. विशाल जावळे पो.कॉ. शर्मा पवार तसेच, सुनील महाडिक पोलीस निरीक्षक, पो ना आसिफ शेख, पुढील तपास दौंड पो स्टे करीत आहे