मुंबई दि१४ :- महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.
शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यासंबंधीचे नोटिफेकशन निघाले असून ते महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे. दि. २८ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी पत्रकार संरक्षण विधेयकावर स्वाक्षरी झाली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील वाढते हल्ले हा चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.
एनयूजे इंडियाच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जंतरमंतर येथे पत्रकार सुरक्षा कायदा,मिडिया आयोग पत्रकार शोषण अशा विविध ल
विषयावर देशभरातील पत्रकारांनी आंदोलन केले. राष्ट्रपती,पंतप्रधान,गृहमंत्री आदीना निवेदन दिले.
आय एफजे ,ब्रुसेल्स हि संघटना जगभरात पत्रकार सुरक्षा आणि इतर समस्यावर आवाज बुलंद करत आहे. नँशनल युनीयन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रने पत्रकार सर्वसुरक्षा,पेन्शन, कामगार कायद्यानुसार हक्क यासाठी राज्यभरातून या पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी आग्रही आवाज उठवला . कायदा मसुद्यात सुधारणा सुचवल्या.दि ७ एप्रिल २०१७ रोजी दोन्ही सभागृहांत तेव्हाचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचं विधेयक मांडले. यावय कोणतीही चर्चा न होता ते विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.ही एक ऐतिहासिक घटना होती.
दि२८ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केली.. दि.८ नोव्हेंबर २०१९ रोजी कायद्याचे नोटिफिकेशन निघाले Maharashtra media person’s and media institutions (prevention of violence and damage or loss to property act 2017)(mah act no xxix of 2019) या नावानं महाराष्ट्रात हा पत्रकार सुरक्षा कायदा अस्तित्वात आला आहे. देशामधे हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र एकमेव पहिले राज्य आहे. याआधी मा पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात प्रसार माध्यमांसह सर्वच आस्थापनात महिला लैगिक अत्याचार विरोधी कायदा (विशाखा गाईडलाईन) लागू करण्यासाठी एनयुजे महाराष्ट्रचे मोठे योगदान दिले आहे. पत्रकार सुरक्षा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून,त्याची अंमलबजावणी तितक्याच अचूकतेने होणे अपेक्षित आहे असे स्पष्ट मत एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त करताना महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व राज्य संघटना ,पत्रकार बंधू भगिनी यांचे अभिनंदन केले एनयुजे इंडियाचे उपाध्यक्ष व एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेद्रकुमारजी यांनी महाराष्ट्रातील पत्रकार एकजुटीचा विजय असून एनयुजे इंडियाचे तत्कालिन अध्यक्ष रासबिहारीजी,महासचिव रतध दिक्षितजी,सध्याचे अध्यक्ष प्रग्यानंद चौधरीजी यांनी केद्रीय पातळीवर महाराष्ट्रातील पत्रकार *ओमप्रकाश पांडे* सुरक्षेचा विषय लावून धरण्यास नेहमीच सहकार्य केले आहे.त्यांचे आभार मानले. एनयुजे महाराष्ट्र सरचिटणीस सीमा भोईर यांनी , या कायद्याला अंतिम स्वरूप देताना व आवाज उठवताना सर्व जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल आभार मानले आहेत. या कायद्यानुसार पत्रकारांवर हल्ला करणारांना तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून पत्रकारांवरील हल्ला अजामीनपात्र गुन्हा असेल पत्रकारांवरील हल्ल्याची चौकशी डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करणार आहे.
या कायद्यामुळे निर्भयपणे काम करण्याठी सच्चा पत्रकारांना सुरक्षेचं अस्त्र मिळालं आहे. तत्कालीन सर्व आमदार आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार हिताय भूमिका घेऊन हे विधेयक मंजूर केले त्याबाबत युनियन व सर्व तालुका जिल्हा पत्रकार संघटना पत्रकार सहकारी यांचे वतीने युनियधचे प्रवक्ते शिल्पा देशपांडे व संदिप टक्के यांनी आभार मानले.