मावळ दि,१५:-मावळ तालुक्यातील अवैध धंदे पुर्णपणे कायमचे बंद करण्याचा मानस आयपीस आधिकारी नवनीत कुमार कावत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.आयपीस आधिकारी नवनीत कुमार कावत यांची उपविभागीय आधिकारी म्हणून नियुक्ति झाली आहे.नवनीत कावत म्हणाले माझ्या कार्यक्षेत्रात वडगाव मावळ कामशेत लोणवळा शहर लोणवळा ग्रामीण अशी चार प्रमुख पोलिस ठाणे येतात. या आदी मावळ तालुक्यात काय चालायचे मला माहित नाही. पण आता या ठिकाणी कोण्त्याही प्रकाराच्या अंवैध धंदे चालू देणार नाही.मावळ उपविभागीय माहिती घेत असताना वडगाव मावळ व कामशेत पोलिस हद्दीतील अनेक हॉटेलवर विना परवाना दारू विक्री केली जात आहे. वडगाव ठिकाणी आर्केस्ट्रा बार जुगाराचे क्लब मटक्याचे धंदे तर कामशेत ठिकाणी अमली पदार्थाची सरास विक्री केली जात आहे. या सर्व संबधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने चालू असलेले अंवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहे.मी उपविभागीय आधिकारी असताना व माझ्या कार्यकक्षेत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू देणार नाहीत तसेच कोणाचही गय केली जाणार नाही. व पोलीस कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन होत असल्यास खबर द्यावी प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून त्याची दखल घेतली जाईल. असे आयपीएस अधिकारी नवनीत कुमार कावत यांनी सांगितले.नागरिकांनी आपल्या परिसरात कोठेही अवैध धंदे जुगार मटका दारू विक्री आढळून आल्यास तात्काळ लोणावळा उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.नवनीत कुमार कावत हे 2017 च्या बँचचे टॉपचे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.लोणावळा उपविभागीय आधिकारी म्हणून त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे.
सतिश सदाशिव गाडे प्रतिनिधी वडगाव मावळ पुणे