पुणे,दि.२८:- पुणे शहरातील खडकी परिसरात दि२४ रोजी सकाळी ०८/३० च्या दरम्यान एका महिलेचा खून करण्यात आला होता.व खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
दरम्यान खडकी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक केली आहे.आरोपीने एकतर्फी प्रेमातून त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, रजनी राजेश बैकेल्लु (वय 44, बोपोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर त्या नोकरीला लागल्या होत्या.
कारखान्यात कामाला येताना त्या आरोपीच्या रिक्षात येत होत्या. यातून त्यांच्यात ओळख निर्माण झाली. या ओळखीतून आरोपी रजनी यांच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र रजनी त्याला दाद देत नव्हत्या. हाच राग मनात धरून आरोपीने सोमवारी सकाळी ०८/३० वा. सुमारास स्टेशन हेडक्वार्टर रोड, खडकी
त्यांच्यावर च चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या रजनी यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.
दरम्यान खून केल्यानंतर आरोपी नासेर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच तांत्रिक तपासावरून तो कर्नाटकातील विजापूर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.या नुसार पथकाने विजापूर येथून आरोपी नासेर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली.
दाखल गुन्ह्यात दि. २६/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ०४, पुणे शहर, आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे पोउप निरीक्षक वैभव मगदुम, सपोफी तानाजी कांबळे, पो.ना. निकाळजे, पो.ना. कलंदर, पो.ना. शेख, पो.शि. सुधीर अहिवळे, पो. सि. अनिकेत भोसले, पो.शि. अषिकेश दिये. म.पो.लि. स्वाती के यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक अमर कदम, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.