पुणे,दि.२६:- झेन्सार- आर.पी.जी. फाउंडेशन तर्फे प्लास्टिक डिस्पोजल मशीन पुणे महानगरपालिकेस सुपूर्त करण्यात आले. आर. पी. जी. फाउंडेशन हे मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५० अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आहे. यामध्ये सियाट लिमिटेड, झेन्सार टेक्नोलॉजीज लिमिटेड, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड रेकम आर. पी. जी. प्रायव्हेट लिमिटेड, आर. पी. जी. लाईफ सायन्सेस लिमिटेड, स्पेन्सर्स आणि कंपनी लिमिटेड, अशा विविध संस्थांचा समावेश आहे. सदर मशीन पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारत येथील तळ मजल्यावर बसविण्यात आले असून मनपा कर्मचारी, इतर नागरिक यांना याचा वापर करता येणार आहे.
या मशीनचे उद्घाटन दि. २६/०४/२०२३ रोजी श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रसाद जगताप, कार्यकारी अभियंता, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, व इतर अधिकारी उपस्थित होते.या मशीनचा वापर करून प्लास्टिक बॉटल्स क्रश करून त्याचा पुर्नवापर व पुर्नचक्रिकरणासाठी उपयोग केला जाणार असून त्यामुळे पर्यावरण संवर्धनास नक्कीच मदत होईल असे यावेळी उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी सांगितले.