पिंपरी चिंचवड,दि.१९:- गाईंना इंजेक्शन देत बेशुद्ध करून त्यांची कत्तल करणाऱ्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली आहे
मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोह अब्दुल रहमान कुरेशी, अशरफ सलमान कुरेशी, मोह. आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारुक कुरेशी, राहुल पंडित ऊर्फ राहुल भैय्या ऊर्फ राहील महंमद कुरेशी, मोशीन शरीफ कुरेशी, जाफर सुजितकुमार सुभाषचंद्र पानीगृही अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे आयुक्तालयासह पुणे ग्रामीण व रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत व इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी गाईंना गुंगीकारक इंजेक्शन देत त्यांना बेशुद्ध करून त्यांची कत्तल केल्याप्रकरणी या आरोपींना पिंपरी चिंचवड दिघी पोलिसांनी या आरोपींना अटक केली. दोन महिने मुंबई, ठाणे व पुणे येथे सापळा रचून दिघी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून तीन वाहने, कोयते, सत्तूर, नायलॉनच्या दोऱ्या, इंजेक्शन, औषधाची बाटली असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच खुनाचा प्रयत्न, दंगल, गाईच्या चोरी, तस्करी यासह इतर प्रकारच्या २९ गुन्ह्यातही आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त, संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्रीमती. प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, दिघी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनील भदाने, पोहवा ७३१ / फलके, पोहवा १८०१ / पोटे, पोहवा १०२० कांबळे, पोहवा ११६८ जाधव, पोना १५७१ विधाते, पौना १५७२ जाधव, पोना १६६५ नवगिरे, पोशि २०१२ दहिफळे, पोशि २०९४ जाधव, पोशि २५५८ शिंदे तसेच मपोना १६२० भाग्यश्री जमदाडे यांनी केली आहे.