पुणे,दि.२५ :- पुणे शहर परिसरातील वाकवस्ती लोणी काळभोर परीसरात बेकायदेशीरपणे एका ठिकाणी काही इसम व्हाटस मोबाईल मध्ये ऑनलाइन कल्याण मटका जुगार घेत व खेळवत असलेल्या जुगार घेणारे आरोपी पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या छापा मध्ये. ७ जणांनान ताब्यात घेतले आहे व ७९ हजार ४७० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.१७) रोजी केली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे व्हाटस मोबाईल मध्ये ऑनलाइन कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण ऑनलाइन पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ७९ हजार ४७० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ७ जणऑनलाइन जुगार घेताना मिळुन आले यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुरनं २०६ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (सी) व (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शना खाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, या पथकाने यशस्वी केली आहे.