पुणे,दि.१९:- पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क परिसरात शनिवार दि.१८ रोजी. द सिग्नेचर थाई स्पावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी ७ तरूणींची सुटका केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, द सिग्नेचर थाई स्पा, विद्युतनगर सोसायटी, प्लॉट नं. २, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने द सिग्नेचर थाई स्पावर छापा टाकला. स्पा मालक आणि मॅनेजरविरूध्द कारवाई करण्यात आली. तेथून परदेशी ३ तरूणींसह एकुण ७ तरूणींची सुटका करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, रेशमा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.०१ आरोपी व ०१ पाहिजे असे दोन तरूणींना पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.