पुणे ग्रामीण,दि.१८:- तक्रारदार यांचे कॉलेज असून, कॉलेज संबंधाने काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती, व कार्यकर्ते ब्लॅकमेल करून खंडणी मागत असलेबाबतचा लेखी तक्रार अर्ज सासवड पोलीस स्टेशन येथे केला होता. ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे.
थेट पोलिस निरीक्षकासाठी एवढ्या मोठ्या लाचेची मागणी झाल्याने पुणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
खाजगी इसम अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक घोलप यांचेकरीता अक्षय मारणे याने (तीन लाख रूपये ) लाचेची मागणी केली त्या लाचमागणीस गणेश जगताप (रा.सासवड) याने सहाय्य केले. म्हणुन लाचमागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ला.प्र.वि.पुणे पोलीस निरीक्षक संदिप व-हाडे तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. वशासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ –
३) व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३
४) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७०० ५) ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in
६) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
७) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in