पुणे,दि.०९ :- पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यत्रातील एकूण १६पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला कोटयावधी रुपयांचा अंमली पदार्थ रांजणगाव येथील एमपीएल कंपनीच्या भट्टीत नष्ट करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस १६ ठाण्यातील गुन्हयातील चरस, गांजा, कोकेन, हेरॉईन,असा मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे.
या कारवाईत चार कोटी १० लाख ६ हजार ४९० रुपयांचा १)७५६ किलो ७६ ग्रॅम गांजा, २)२ किलो. ९६५ ग्रॅम चरस, ३) ३९० ग्रॅम.७६ मीलीग्रॅम कोकेन, ४) ०१ किलो २९८ ग्रॅम हेरॉईन एकूण चार कोटी १० लाख ६ हजार ४९० रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल राजणगांव येथील एमईपीएल कंपनीचे भट्टी मध्ये दिनांक ०८/०२/२०२३ रोजी संपुर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करुन नाश करण्यात आला.पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या कमिटीच्या देखरेखेखाली हे अंमली पदार्थ नाश करण्यात आला
१) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर (कमिटी अध्यक्ष २) अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर (कमिटी सदस्य ३) रोहिदास पवार, पोलीस उप आयुक्त, मुख्याल, पुणे शहर (कमिटी सदस्य ) तसेच अंमली पदार्थ नाश प्रक्रियेत शासनाचे इतर विभागचे अधिकारी उपस्थित होते.
१) दत्तात्रय द.गवळी, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ पुणे २) संदिप रघुनाथ पाटील, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ पुणे ३) उल्का कृ.कुलकर्णी, सहा. रासायनिक विश्लेषक प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा, पुणे ४) समीर एल. पाटील, निरीक्षक भरारी पथक १ राज्य उत्पादन शुल्क पुणे ५) विठ्ठल बी. बोबडे, निरीक्षक भरारी पथक १ राज्य उत्पादन शुल्क पुणे सदरची कार्यवाही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ व ०२ गुन्हे शाखा, पुणे, विनायक गायकवाड व सुनिल थोपटे तसेच अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.