पुणे,दि.०९:- खराडी व चंदननगर पुणे परिसरात सुरु असलेल्या पणती पोकळी सोरट जुगार अड्ड्यावर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १७ जणांना ताब्यात घेऊन 23 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.८) करण्यात आली.
खराडी, चंदननगर येत एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीर पणती पोकळी सोरट जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. व पथकाने पाळत ठेवून छापा टाकला.
त्यावेळी पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगारातील रोख रक्कम २३ हजार ३७० व जुगाराचे साहित्य जप्त केले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींवर चंदननगर पोलीस ठाण्यात ,गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव,
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.