पुणे,दि.०८:- पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोकडून उड्डाण पुलाच्या कामाचे लवकरच नियोजन असून, मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे विद्यापीठ चौक व गणेश खिंड रस्ता परिसरातील वाहतूकीत बदल करण्याचे नियोजन केले आहे. हे नियोजन प्रायोगिक तत्वावर असून येत्या सोमवार दिवसापासून हा बदल लागू होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड आणि सेनापती बापट रोड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे.
१) बाणेर रोड व औंध रोडने विद्यापीठ चौकात येणारी वाहने ही विना सिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जाणेबाबत प्रस्तावित आहे. तसेच विद्यापीठ चौक येथे पादचा-यांना रस्ता ओलांडणेकरीता वेळ देण्यात येत आहे.
२) गणेशखिंड रोडने सेनापती बापट रोडकडे जाण्याकरीता यापुर्वी कॉसमॉस बँक येथे यु टर्न देण्यात आला होता. सदरचा यु-टर्न बंद करुन सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
३) सेनापती बापट रोडने (चतुःश्रृंगी मंदिर) येथून विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रोड जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रोडकडे वळविणे प्रस्तावित आहे.
४) गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौकातून औंधकडे जाण्यासाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.
पर्यायी वर्तुळाकार मार्ग १ :- गणेशखिंड रोडकडून व सेनापती बापट रोडकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोस्टे, केंद्रीय विद्यालय, कस्तुरबा गांधी वसाहतकडे जाणा-या वाहनांकरीता पाषाण रोडने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रोडने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.
किंवा
पर्यायी वर्तुळाकार मार्ग २ :- पाषाण रोडने अभिमानश्री सोसा. पाषाण रोड जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसा. बाणेर रोड जंक्शन उजवीकडे वळून बाणेर रोडने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.
किंवा
√ पर्यायी मार्ग ३ :- गणेशखिंड रोडकडून व सेनापती बापट रोडकडून औंधकडे जाणा-या वाहनांकरीता पाषाण रोडने अभिमानश्री सोसा. पाषाण रोड जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसा. बाणेर रोड जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय. टी. आय. रोडने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील
५) पिंपरी चिंचवड बाजुने राजीव गांधी पूलाकडून पुणे स्टेशनकडे जाणा-या व परत येणा-या नागरिकांसाठी पर्यायी मार्ग
पर्यायी मार्ग :- राजीव गांधी ब्रिजकडुन खडकी, येरवडा, पुणे स्टेशन, लष्कर, कोरेगांव पार्क कडे जाणा-या वाहनांकरीता ब्रेमन चौकातून डावीकडे वळुन स्पायसर कॉलेजरोड, आंबेडकर चौ उजवीकडे वळून करता येईल. 2/2 खडकी पोस्टे रेल्वे अंडरपास डावीकडे वळून चर्च चौक, जुना पुणे मुंबई महा….
पर्यायी मार्ग :- पुणे स्टेशन, कोरेगांव पार्क, मुंढवाकडून औंधकडे येणा-या वाहनांकरीता इंजिनीअरींग कॉलेज उड्डाणपुलावरुन वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, डावीकडे वळून खडकी पोस्टे अंडरपास, डावीकडे वळून मरिआई मंदिर, उजवीकडे वळून गोगादेव चौक, उजवीकडे वळून जे टाईप (फुटबॉल ग्राऊंड), उजवीकडे वळून साई चौक, डावीकडे वळून आंबेडकर चौक, स्पायसर चौक, ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.
उपरोक्त नमुद १ ते ५ पर्यायी मार्ग हे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहेत. तरी सर्व नागरिकांनी वर नमुद पर्यायी व इतर मार्गाचा वापर करुन वाहतूक सुरळीत राहणेकामी वाहतूक पोलीसांना सहकार्य करणेबाबत पुणे शहर पोलीस, पुणे शहर वाहतूक विभाग, पुणे मनपा, पी. एम. आर. डी. ए., मेट्रो विभाग यांचेकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.