पुणे,दि.०८ :- पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. मोटारसायकलची चोरी करणा-या एका अट्टल चोराला पुणे शहर बंडगार्डन पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील विविध ठिकाणांवरुन, मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.पुणे शहरात पोलिसांन कडे
रोज तक्रारी येत असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरट्यांविरुद्ध मोहीम तीव्र करून चोरट्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. गुरुवारी (दि.०७) रोजी बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना बंडगार्डन पोलिसांना गोपनीय बातमीच्या आधारे एका आरोपीला अटक करून.२ ऑटो रिक्षा व १ दुचाकी व आरोपी रफिक छोटू शेख वय २१ वर्ष राह. कोंढवा, पुणे अटक केली. त्याच्याकडून २ ऑटो रिक्षा,व १ दुचाकी चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आले असून, विविध ठिकाणाहून चोरलेल्या २ ऑटो रिक्षा,व १ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील मॅडम परिमंडळ २, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर राजे साहेब वपोनि संतोष पाटील , पोलीस निरीक्षक (गुन्हे )अश्विनी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो.अंमलदार मोहन काळे, सुधीर घुटकुले, अमोल सरडे, शंकर संपते, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांचे पथकाने केली.