पुणे,दि.०४:- पुणे महापालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या रचनेनुसार पथविक्रेता संवर्गातून आठ पथविक्रेता प्रतिनिधींची नेमणूक निवडणुकीद्वारे . त्यापार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान आज झाले व
महाराष्ट्र शासन राजपत्र, दि.०३/०८/२०१६ अन्वये कामगार विभागातील सक्षम प्राधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त, पुणे जिल्हा यांच्या अधिपत्याखाली पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी पथ विक्रेता समितीतील सदस्यांच्या निवडणुकीसाठी आज दि. ०४ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पुणे मनपा १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या एकूण ३२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. सदर निवडणुकीमध्ये एकूण ११,९०९ पथ
विक्रेता मतदारांपैकी ६८७९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यामध्ये एकूण ४९६३ पुरुष व एकूण १९१६ स्त्री मतदार सहभागी झाले आहेत. त्यानुसार पूर्ण शहरात ५८ % मतदान झाले आहे. या निवडणूक प्रक्रीयेसाठी पथ विक्रेता सदस्यांनी उत्साहात मतदान केल्याचे सदर निवडणूक टक्केवारी वरून दिसून आले आहे. या निवडणुक प्रक्रियेकरता पुणे
मनपाकडील विविध विभागातील सुमारे ४८० अधिकारी / कर्मचारी, पोलीस यंत्रणा, अतिक्रमण/ अ.बां.नि विभागाकडील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी, तसेच, अप्पर कामगार आयुक्त, पुणे विभागाकडील ०८ अधिकारी / कर्मचारी सहभागी होते. व दि.०५/१२/२०२२ रोजी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, शिवाजीनगर घोले रोड, पुणे येथे सकाळी ११.०० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रात फक्त निवडणुकीचे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे.