पुणे,दि.०३ :-मुंढवा परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गेल्या दीड वर्षात शहरातील ११२ गुंड व दहशत माजविणाऱ्या टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.मुंढवा परिसरातील टोळीप्रमुख आरोपी नामे १) योगेश प्रकाश नागपुरे,वय ३५ वर्षे (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी) २) प्रमोद अजित साळुंखे, वय २५ वर्षे, रा. लेन नंबर १, खराडी, पुणे. ३) वाजीद अश्पाक सय्यद, वय २५ वर्षे, रा. सर्वे नंबर २१/०४, क्रांतीपार्क, शिवानंद हॉटेल जवळ, खराडी पुणे. ४) मंगेश बाळासाहेब तांबे, वय २८ वर्षे, रा. सर्वे नंबर २०/०४, खराडकर पार्क, नदी पुलाजवळ, खराडी पुणे. ५) लक्ष्मणसिंग उर्फ हनुमंता छत्तरसिंग तंवर, वय ३५ वर्षे, रा. एच. एम. एस. हेवन बिल्डींग, फ्लॅट नंबर ५०२. घुलेनगर, मांजरी, पुणे ६) एक महिला ( पाहिजे आरोपी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यांचे पैकी प्रमोद साळुखे याने पत्रकार असल्याचे सांगुन तक्ररारदार यांचे गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्याची विक्री करुन, दोन नंबरचा धंदा करता यापुर्वी गुटख्याची विक्री करुन खुप पैसा कमावला आहे. आता पेपरमध्ये बातमी लावुन, बदनामी करुन, पुर्णपणे बरबाद करुन टाकतो जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खुनच करुन टाकतो अशी धमकी देवुन फिर्यादी यांचे मुलाला हाताने मारहाण करुन, त्यांचे पत्नीला व मुलाला गोडाऊन मधुन बाहेर पडण्यास अटकाव करुन, जबरदस्तीने ०५ लाख रुपये खंडणी घेवुन गेले आहेत.योगेश नागपुरे, आणि साथीदारांनी मुंढवा भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. नागपुरे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजित लकडे, यांनी तयार केला होता. या प्रस्तावासपोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर, विक्रांत देशमुख यांच्या मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, नामदेव चव्हाण यांनी नुकतीच मंजुरी दिली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर बजरंग देसाई, हे करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ५ पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर,अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). प्रदीप काकडे, सहा. पोलीस निरीक्षक. समीर करपे, पोलीस अंमलदार हेमंत झुरुंगे, नाना भांदुर्गे, दिपक कांबळे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ४९ वी व एकुण ११२ वी कारवाई आहे.