पुणे,दि.०१:- हॉटेल साठी लागणारा सिलेंडर किंवा इतर व्यावसाय साठी एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये 115 रूपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये ‘इंडेन’चे 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 115.5 रूपये, कोलकतामध्ये 113 रूपये, मुंबईमध्ये 115.5 रूपये व चेन्नईमध्ये 116.5 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. अर्थात ही कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झाली आहे. घरगूती सिलेंडरचे दर गेल्या 6 जुलैपासून बदलले नाहीत.
देशातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरचे दर निश्चित करत असतात. सलग आठ महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयओसीएल नुसार, 1 नोव्हेंबरपासून 14.2 किलोचा घरगूती गॅस सिलेंडर जुन्या दरांनीच मिळणार आहे परंतू व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झालेल्या स्वस्त मिळणार आहे. दिल्लीमध्ये ‘इंडेन’चे 19 किलो व्यावसायिक सिलेंडर 1859.5 रुपयांऐवजी 1744 रुपयाला मिळेल. तसेच
कोलकातामध्ये कमर्शियल सिलेंडर 1846 रुपयांना मिळेल. यापूर्वी हा सिलेंडर 1995.50 रुपयांना मिळत होता. मुंबई में कमर्शियल सिलेंडर 1844 रुपयांऐवजी 1696 रुपयांना मिळेल.
चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर 1893 रुपये असतील। यापूर्वी 2009.50 रुपये दर होते.
14.2 किलो सिलेंडरचे दर
कोलकाता 1079
दिल्ली 1053
मुंबई 1052.5
चेन्नई 1068.5