पुणे,दि.०२:- पौड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भुकूम येथील बांधकाम साईट वरून सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटांची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या चार चोरट्यांना पौड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी लोखंडी प्लेटा व मालवाहू टेम्पो,असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील आरोपी नामे १) किरण शाम नवाळे वय २७ वर्षे रा.साक्षी अपार्टमेंट प्लॅट नं. ५०५ भुकूम ता. मुळशी जि.पुणे २) सुरज दत्तात्रय ननावरे वय २६ वर्षे रा. साक्षी अपार्टमेंट प्लॅट नं. ५०५ भुकूम ता. मुळशी जि. पुणे ३) जयश मोहन सागरे वय २७ वर्षे रा. चाळ नं. ९ मोरे विदयालयाजवळ कोथरूड पुणे ४ ) स्वप्नील शंकर भोंगळे वय २५ वर्षे रा. गल्ली नं. ६ मोरे विदयालयाजवळ कोथरूड पुणे असे अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पौड भुकूम येथील बांधकाम साईट वरून सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटांची
लोखंडी साहित्य विक्री मोसीम सुलतान खान रा. दापोडी पुणे यास विकी केलाअसल्याची गोपनीय माहिती पौड पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पाहणी केली असता मालवाहू टेम्पो व बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर लोखंडी प्लेटा चोरी करून आणल्याचे समोर आले. यावरून आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा लोखंडी प्लेटा, असा एकूण सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना दिनांक २८/११ / २०२२ रोजी अटक केली आहे. सदर आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत. सदर गुन्हयाचा तपास ढोले. उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग, धुमाळ, पोलीस निरीक्षक पौड पोलीस स्टेशन, गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार अनिता रवळेकर, पोलीस नाईक सिध्देश पाटील, पोलीश शिपाई अक्षय नलावडें मपोहवा, हरिश्चंद्रे यांनी केला असून पुढील तपास पो.हवा. अनिता रवळेकर करीत आहेत.