पंढरपूर,दि.२८:- कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुखुमाईचे दर्शन मिळावे यासाठी आजपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांना २४ तास मिळणार आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविकांना सुलभतेने दर्शन होईल.कार्तिक यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येथील अशी अपेक्षा आहे त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम पूर्ण केले आहे.यात्रा काळात १५ दिवस विठुरायाचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे देवाचा पलंग काढून ठेवण्यात येतो. देवाच्या पाठीशी तक्या ठेवून देवाला आधार दिला जातो. तो पौर्णिमेला काढण्यात येतो.