पुणे,दि.०५ :-लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला मंगळवारी (दि.3) दुपारी चारच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करुन रेल्वे स्थानकावर महेश कवडे नावाच्या व्यक्तीने बॉम्ब ठेवला असल्याची मातसेच बॉम्ब बाबत अधिक माहिती हवी असल्यास 7 कोटी रुपये द्या अशी मागणी आरोपीने केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी (3) रात्री वाघोली व रांजणगाव एमआयडीसी येथून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
लोहमार्ग पोलिसांनी वाघोली येथून करण भिमाजी काळे (वय – 33 रा. नावरे, ता. शिरुर) अटक केली. तर रांजणगाव एमआयडीसी येथून सुरज मंगतराम ठाकुर (वय – 30 रा. नशेली, ता. मुखेरीया, पंजाब) याला अटक केली. आरोपींकडे केलेल्या सखोल तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी महेश कवडे आणि सुरज ठाकुर यांच्यावर आयपीसी 182, 505(1)(ब), 506(2), 34 नुसार लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करुन बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. तसेच बॉम्ब बाबत अधिक माहिती पाहिजे असेल तर 7 कोटी रुपये द्या अशी मागणी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानकची पाहणी केली. तसेच येणाऱ्या – जाणाऱ्या 17 गाड्यांची तपासणी केली. मात्र, बॉम्ब सदृष्य वस्तू मिळाली नाही. दरम्यान रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस आल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपींचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नियंत्रण कक्षाला आलेला कॉल वाघोली परिसरातून आल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांचे एक पथक वाघोली येथे रवाना करण्यात आले.
पोलिसांनी वाघोली परिसरातून करण भिमाजी काळे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता दोन मोबाईल आढळून आले.
त्यापैकी एका मोबाइलचा वापर करुन दहशत पसरवणारा कॉल केल्याची कबुली आरोपीने दिली.
तसेच मोबाईल मधील सिम कार्ड सुरज ठाकूर याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला रांजणगाव एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले.
पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्गचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील
अपर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षिरसागर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर
स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्गचे पोलीस निरीक्षक इरफान शेख
महिला सहायक पोलीस निरीक्षक अस्मीता पाटील
महिला पोलीस हवालदार लक्ष्मी कांबळे, सुनील कदम, अमरदिप साळूंके, संतोष जगताप, पोलीस नाईक सचिन राठोड,
रुपेश पवार, अमीत गवारी, उदय चिले, संदीप काटे, माधव केंद्रे, चालक पन्हाळकर यांच्या पथकाने केली.