पिंपरी चिंचवड,दि.२२ :- किल्ले शिवनेरी ते पुण्यातील श्वारुढ पुतळा डांगे चौक वाकड या मार्गावरून पिंपरी चिंचवड मधील सात शिवकन्यांनी अनवाणी पायाने, नऊवारी साडी परिधान करून धावत शिवज्योत आणली.नऊ ते 14 वर्ष वायोगातील या सर्व शिवकन्यांचा या उपक्रमाबाबत सर्व स्तरातून गौरव होत आहे.21 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाली. शिवजयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील नऊ ते 14 वर्ष वायोगातील सात मुलींनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते डांगे चौक पर्यंत नऊवारी साडी परिधान करून अनवाणी पायाने शिवज्योत धावत आणली. 80 किलोमीटर अंतर मुलींनी अनवाणी पायाने धावत पूर्ण केले. वृदुला पवार, भक्ती दहिफळे, सानिका माने, मधुरी पाटील, नेत्रा ढगे, श्वेता निमण, दीप्ती पाटील या कन्या या आगळ्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
मध्यरात्री 12 वाजता मुलींनी शिवज्योत घेऊन धावण्यास सुरुवात केली. नारायणगाव मार्गे पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी शिवज्योत आणली. ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व मुलींचे हितगूज साधून त्यांच्या या उपक्रमा चे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.