पुणे ग्रामीण, दि.१८ :- इंदापूर तालुक्यातील एका तलाठ्याने हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीमध्ये रात्री उशिरा अटक केली.प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण भगत हा इंदापूर तालुक्यातील कुरवली गावाचा तलाठी आहे. तक्रारदाराने हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची नोंद करण्यासाठी भगत याने १८ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केली असता तडजोड करुन १२ हजार रुपये लाच घेण्यास मान्यता दिली. भगत हा बारामतीमध्ये राहतो. त्याने तक्रारदार याला लाचेचे पैसे घेऊन घरी बोलावले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री उशिरा बारामतीतील भगत याच्या घराबाहेर सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच घेताना प्रवीण भगत याला रंगेहाथ पकडण्यात आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर अधीक्षक सुरज गुरव अपर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली