मुंबई, दि१७: – मुंबई शहरात तब्बल 03 कोटी रूपये किमतीचा अंमली पदार्थांचा (हेरॉईन ड्रग्जचा) साठा जप्त करण्यात आला. त्या कारवाईवेळी पोलिसांनी ऐकास अटक केली.हस्तगत करण्यात आलेला हेरॉईन ड्रग्जचा) साठा राजस्थान येथून आल्याचे उघड झाले.मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी कक्ष , आझाद मैदान युनिट पोलीस निरीक्षक राजेंद दहिफळे यांना गोपनीय बातमीदाराकडुन प्रतापगड , राजस्थान येथील एक पुरवठादार इसम हा बोरीवली , मुंबई परीसरात ‘ हेरॉईन ‘ या अंमली पदार्थाची विक्री करण्यासठी येत असल्याची खबर मिळाली . त्याप्रमाणे विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बोरीवली पूर्व , मुंबई परीसरात आझाद मैदान युनिटचे पोलीस पथकाने सापळा लावुन राजस्थानचा रहिवाशी असणारा इसम नामे प्यारे अमनउल्ला खान , वय ६५ वर्षे , रा.ठी. जि . प्रतापगड , राजस्थान याचेकडून ०१ किलोग्रॅम ‘ हेरॉईन ‘ ( किंमत अंदाजे 03 कोटी रूपये किमतीचे ) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे . आरोपींचे विरोधात अं.प. वि . कक्ष , गुन्हा दाखल करु 2 / 2 आरोपीस दिनांक १५/०१/२०२२ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच या गु अनुषंगाने अंमली पदार्थांचे तस्करीत सहभागी असणारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे . गुन्हयातील जप्त अंमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे . अटक आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळणी असता सदर आरोपीवर आझाद मैदान युनिट येथे गु.नों.क्र . ३ ९ ५ / २०१३ , कलम ८ ( क ) सह २१ , २ ९ एनडीपीएस कायदा १ ९ ८५ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्हयामध्ये तो जामिनावर मुक्त आहे . तसेच सदर अटक आरोपी हा अंमली पदार्थ विरोधी कक्षामधील एका गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी आहे . अशा प्रकारे ‘ अंमली पदार्थमुक्त समाज ‘ बनविण्याचे दृष्टिने बृहन्मुंबई शहर पोलीस आयुक्तालय सतत प्रयत्नशील आहे . सदरची कारवाई पोलीस सह आयुक्त ( गुन्हे ) , मिलिंद भारंबे सो, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , विरेश प्रभु, .पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहा . पोलीस आयुक्त , पो . नि . अतुल डहाके, ( अतिरीक्त कार्यभार ) , अंमली पदार्थ विरोधी कक्ष , मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष , आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. मानसिंग काळे , पो.उ.नि. अभिजीत पाटील , पो.उ.नि. अमित देवकर , पो.ना. क्र . ०५०२११ / चव्हाण , पो.ना.क्र . ०६१५१५ / करांडे , पो.शि.क्र . ०८०७१२ / भुजबळ , पो.शि.क्र . १४०१ ९ ३ / सिंह , पो . शि.चा. क्र . ०७१६१० / राठोड पो.शि.चा.क्र . ०७०२०७ / निबांळकर यांनी पार पाडली असून गुन्हयाचा पुढील तपास मा . वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मानसिंग काळे हे करीत आहेत