श्रीगोंदा,दि१४ :- -नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १४ जानेवारी रोजी होत आहे.अगदी सुरुवातीपासूनच मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने नागवडे कारखान्याचा रणसंग्राम चांगलाच गाजतो आहे.
कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला अन लगेचच केशव भाऊ मगर यांनी गार येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात पाचपुते गटाचे काष्टी सोसायटीचे संस्थापक भगवान आबा पाचपुते हे उपस्थित राहिले.पाचपुते बोलताना म्हणाले की,गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार विरुद्ध खासगी असा प्रचार करून नागवडे यांनी कारखान्यावर सत्ता मिळवली.आता त्याचे स्वतः चे परभणी येथे एक खासगी साखर कारखाना,कराड येथे गुळाचा कारखाना ही एवढी माया कुठून गोळा केली.असे आरोप करत सभासदांना व कार्यकर्त्याना मताधिक्यासाठी आवाहन केले.
कारखान्याची सत्ता सध्या राजेंद्र नागवडे यांच्याकडे आहे.नागवडे हे काँग्रेसवासी असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी भाजपचे माजी मंत्री व विद्यमान आमदार बबन दादा पाचपुते यांनी केशव भाऊ मगर,आण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे यांच्याशी राजकीय मनोमिलन करून पाचपुते यांनी कारखाना निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविणार हे जाहीर केले आहे.
प्रस्थापितांचे सक्षम विरोधक म्हणून आमदार बबनराव पाचपुते यांना स्वीकारणाऱ्या सभासदांची संख्या लक्षणीय आहे.प्रस्थापितांनी पाच वर्षांच्या कालावधीत सभासद संख्या कमी केल्यामुळे अन् पाचपुते-मगर यांच्या मनोमिलनामुळे प्रस्थापितांना जबर फटका बसेल असा सुर सभासदांमधून निघत आहे. तसेच प्रस्थापितांच्या पाठीशी सभासद किती आक्रमकपणे उभी राहतात यावरही निवडणुकीची नेमकी गोळाबेरीज अवलंबून राहील.
गार येथील कार्यक्रमात भगवान आबा पाचपुते, केशव मगर, अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे,ऍड.बाळासाहेब काकडे,बाळासाहेब नाहटा, टिळक भोस,अनिल ठवाळ, बाळासाहेब गिरमकर,संजय आबा जामदार अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
चौकट :-ढोकराई येथे नागवडे गटाने इच्छुकांना मुलाखतीस बोलावले होते,त्याठिकाणी २०० इच्छुक सभासद शेतकऱ्यांनी मुलाखती दिल्या.श्रीगोंदा गटातील एका विद्यमान संचालकाला बाबूर्डी,म्हातारपिंप्री,मढेवडगावा तील सभासदांनी विरोध दर्शविला तरी त्या संचालकाला पुन्हा उमेदवारी मिळाली तर त्याचा फटका सत्ताधारी पॅनलला नक्की बसणार आहे.असे सभासद वर्गातुन बोलले जात आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे