श्रीगोंदा,दि.१४:- तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्याना आर्थिक लाभ मिळण्यासाठी श्रीगोंदा कँनरा बँकेच्या वतीने दि-१० डिसेंबर पासून गोल्ड प्लाझा उदा-(प्रति ग्रॅम कमाल दर, शेतकी कर्जासाठी सरळ व्याज, कमीत कमी प्रक्रिया शुल्क, परत फेडीमध्ये लवचिकता,त्वरित वितरण)जास्तीत जास्त जनतेने याचा लाभ मिळणेकरीता कैनरा बैंकेशी संपर्क साधावा असे आव्हान शाखेचे मँनेजर राहुल मोहिले यांनी केले आहे.
गोल्ड प्लाझाचे उद्घाटन- माऊली उद्योग समुहाचे अध्यक्ष माऊली हिरवे यांच्या हस्ते झाले, यावेळी प्रदीप वैद्य,सुनील ढवळे, अशोक डाळीबकर,विकास बारूडे,संभाजी गायकवाड़ यांच्या सह बॅकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.उपस्थितांचे बँक मँनेजर संदीप देशमुख यांनी आभार मानले.
सोने तारण कर्ज कमीत कमी व्याजदर…
कँनरा बैंक श्रीगोंदा येथे गोल्ड लोन डिपार्टमेंटचे उद्घाटन माऊली हिरवे यांच्या हस्ते झाले.
माऊली उद्योग समुह व कॅनरा बँकेचा २० वर्षीचा आर्थिक संबंध. एक सर्व साधारण खातेदार ते आज प्राइम खातेदार पर्यंतचा प्रवास करत असताना तयार झालेल्या व्यव्हारीक नातेसंबंधातून आज बॅंकेने मला बोलून मोठेपना दिला त्या बद्दल मी बॅकेचा आभारी आहे
माऊली हिरवे…..